सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि रा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ७ व ९ नोव्हेंबरला ‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालमीचे आयोजन केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. या कार्यक्रमात आज (ता. ७) ‘टेबल टॉप एक्सरसाईज’ हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम व्ही.सी. द्वारे घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्यातील यंत्रणा कशा रीतीने प्रतिसाद देणार आहे, याची माहिती विविध जिल्हास्तरीय यंत्रणांकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली घेणार आहे. जिल्हाधिकाररी कार्यालयात आज होणाऱ्या कार्यक्रमात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.





