सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी तात्काळ जिल्हा रुग्णालय व नंतर गोव्यातील एका खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. काल सोमवारी सकाळी कामावर हजर झाल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभागी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असता हृदयविकाराचा त्रास त्यांना होत असल्याचे जिल्हा रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचार करून त्यांना सोमवारी दुपारी गोव्यातील एका खासगी रुग्णालयात घालवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ संजू आकेरकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील काही अधिकारी व डॉक्टरही गेले आहेत.



