बांदा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान अत्यंत शांततेत सुरु…!

सावंतवाडी : तालुक्यातील बांदा येथे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा व व्ही के तोरस्कर कनिष्ठ विद्यालय या केंद्रावर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत सुरू आहे. साडेअकरा वाजेपर्यंत 45.65 टक्के मतदान झाले आहे. या केंद्रावर एकूण 92 मतदार असून त्यापैकी 42 मतदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. निवडणूक केंद्रप्रमुख म्हणून महेंद्र डामरेकर काम पाहत आहेत.

बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे समीर व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अत्यंत शांततेत मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.