मांगेली रस्त्याचे संरक्षक कठडे, भिंती पुन्हा बनवण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईल दाखवू : सुनील गवस

दोडामार्ग : मांगेली गावातील युवा वर्ग हा नजीकच्या गोवा राज्यात कामासाठी ये जा करत असल्यामुळे तसेच मांगेली फणसवाडी तळेवाडी येथील रात्रीच्या वेळची परिस्थिती आंबोली घाटासारखी असल्या कारणाने व धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व वाहनचालकांना रात्रीच्या वेळी मोठी कसरत करावी लागते.

तिलारी पाटबंधारे यांच्या अखत्यारित खोक्रल ते मांगेली देऊळवाडी हा रस्ता असताना त्यांनी ठिकठिकाणी संरक्षक कठडे बांधले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्ते दुरुस्तीच्या वेळी सदरचे कठडे तोडण्यात आले. मात्र दोन्ही विभागांनी आता मात्र पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे. तरी गांभीर्यपूर्वक विचार करून सदर रस्त्याचे संरक्षक कठडे, संरक्षक भिंती पुन्हा नव्याने बनवण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असे मनसे तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी बोलताना सांगितले आहे.