‘रापण’ एक संस्कृती..!

143

देवगड : कुणकेश्वर रापण महोत्सव २०२३ निमित्त ‘रापण’ ही एक पारंपारिक मासेमारी करण्याचा प्रकार आहे. रापण ही एक कोकणातील किनारपट्टीची संस्कृती देखील आहे. रापण संस्कृतीला कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत फार मोलाचे स्थान आहे. पण रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून हळूहळू लोप होताना दिसत आहे तर त्यातच काही रापण संघ ती टिकावी म्हणून प्रयत्न करत आहेत. अशीच आणखीन एक कोकणातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली म्हणजे वारली चित्रकला वारली जनजातींची चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत पण अशी संस्कृती जी आधुनिकिकरनामुळे आपले अस्थित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकाराकडे पाहिले जाते अशा या चित्रशैलीत सिंधू संजीवन संस्था देवगड यांच्या संकल्पनेतून कलाकार श्री विश्वजीत शिंदे यांनी कोकणातील रापणीचे चित्र साकारून या दोन्ही संस्कृतीना जिवंत ठेवण्याचा व पर्यटकांना एक वेगळा अनुभव देण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न ग्रामपंचायत कुणकेश्वर मार्फत करण्यात आला.