मुंबई : येथील मंत्रालय परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं. काही वेळापूर्वी आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळंही लावलं होतं. सत्ताधारी आमदारांचाही आंदोलनात सहभाग होता. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची आमदारांची मागणी होती. अखेर पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेण्यास सुरू केली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे, शरद पवार गटाचं आंदोलन; सुप्रीया सुळेही सहभागी –
विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रीया सुळे यादेखील उपस्थित असून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
कुलाब्यातील ससूनडॉक बंद, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उचललं पाऊल –
ससूनडॉक कुलाबा येथील सखल मराठा समाजाच्या वतीनं रमेश जरांगे पाटील हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी आमरण उपोषाण करत असलेल्या आंदोलनाला ससून डॉक येथील सर्व मराठी व्यवसायिकांच्या वतीनं कृष्णा दादा पवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आपला व्यवसाय ऐक दिवस बंद ठेवून मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचे पूजन करून मोठ्या संख्येने जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
पुण्यातील नवले पूल जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल –
पुण्यातील नवले पूल जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाचे आदेश –
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे.





