सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरीत प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुणकेरी आयोजित लाॅरेन्स अॅड मेयो पुरस्कृत नेत्र तपासणी शिबीर मनसे सैनिक सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या शिबिरात गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून एकूण ९३ लोकांनी आपली नेत्र तपासणी केली. सदर नेत्र तपासणी शिबीरास नेत्र तपासणीसाठी आलेल्या लोकांनी जादूगार केतन सावंत यांना आशीर्वाद देत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लोकांच्या प्रेमापोटी केतन सावंत यांनी लोकांना आश्वासन दिले की लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी दरवर्षी असेच लोकोपयोगी कार्यक्रम नक्की घेऊ.!

दरम्यान, सदर कार्यक्रमासाठी मनसेचे सिंधुदुर्गातील नेते व महाराष्ट्र सरचिटणीस संदीप दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि सावंतवाडी संपर्क अध्यक्ष महेश परब, कुणकेरी गावचे सरपंच सोनिया सावंत, कुणकेरी ग्रामपंचायत सदस्य आत्मेश सावंत, ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे सदस्य राणे महाराज, कला क्रीडा विकास मंडळ, कुणकेरी वाचनालय यांचे खजिनदार राजन मडवळ, सावंतवाडीतील हॉटेल व टुरिस्ट उद्योजक अवधूत नाटेकर, मळगाव माजी शाखा अध्यक्ष राकेश परब, दशावतारातील हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शंकर गुरव, शतायु जांभळे, भूषण सावंत, साईल तळकटकर, अनिकेत दळवी, दिपाली राऊळ, संध्या पाताडे आकाश मराठ, ओंकार नवार, प्रथम राठोड, उदय सावंत, अर्जुन गावकर, पांडुरंग सावंत, जय राऊळ, रामचंद्र सावंत, गौरव राऊळ, सद्गुरू पुजारी, आप्पा परब, तुकाराम कुणकेरकर इतर सर्व व केतन सावंत मित्र मंडळाचे सदस्य आणि लाॅरेन्स अॅड मेयो राणे मॅडम यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
.





