कुडाळ : दिनांक 26 ऑक्टोबर रोजी कसाल हायस्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत पारंपारिक गायन प्रकारात अणसूरपाल हायस्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी मंदार बापू नाईक यानेप्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे संस्था अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व समाजातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे





