हनुमानगढ : राजस्थानमधील हनुमानगढ जिल्ह्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा नोरंगदेसर गावाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हनुमानगडचे एसपी आणि एसडीएम घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर मेगा हायवेवर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते.
कार आणि ट्रकची समोरासमोर धडक –
ओव्हरटेक करत असताना कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.या अपघातात आई, दोन मुलगे, दोन सून, नातू, नातवंडे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेला मुलगा आकाश आणि मुलगी मानराज यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत हे टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील नोरंगदेसर गावचे रहिवासी आहेत. राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगढच्या टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील नोरंगदेसरजवळ शनिवारी संध्याकाळी कार आणि ट्रकमध्ये जोरदार टक्कर झाली.यामध्ये कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतांची ओळख पटविण्यात येत आहे.
जखमींना रुग्णालयात केले दाखल
हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी उपस्थित लोकांनी मोठ्या प्रयत्नानंतर गाडीतील लहान मुले, महिला व पुरुषांना बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये एका मुलीची प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच एका 3 वर्षीय मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.





