कणकवली : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू कु. पंकज महेंद्र चव्हाण याने १७ वर्षे वयोगट व ५१ वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या क्रीडा प्रकारात त्याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला, ही स्पर्धा दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई (मुलुंड) येथे संपन्न झाली
या खेळाडूला प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा मार्गदर्शक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूचे संस्था अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





