आयुर्वेद जनजागृती अभियानांततर्गत रोणापाल येथे आरोग्य शिबीर संपन्न.!

86

बांदा : भाईसाहेब सावंत आयुर्वेद काॅलेज, सावंतवाडी आणि दयासागर छात्रालय, रोणापाल यांच्या संयुक्त विद्यमाने रोणापाल गावातील ग्रामस्थ व मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार, तसेच महिलांसाठी मार्गदर्शन (गरजेनुसार महिलांची आरोग्य तपासणी) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेज सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रणवकुमार ठाकरे व किरण सानवी आणि प्रार्यचिता खटके यांनी शिबिरात रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोणापाल तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गावडे, माजी सरपंच उदय देऊलकर, छात्रालयाचे व्यवस्थापक जीव बावीर तसेच छात्रालय परिवार उपस्थित होता. या शिबिरात डॉ. बाबासाहेब पाटील व डॉ. प्रणव कुमार ठाकरे यांनी दिनचर्या, ऋतुचर्या, मधुमेह व लठ्ठपणा या विषयावर व्याख्यान देऊन उपस्थिताना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या? याचे मार्गदर्शन केले. डॉ. विशाल पाटील यांनी नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात सुमारे पन्नास रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. सर्व रुग्णांना औषधोपचार मोफत देण्यात आले.