देवगड : वायंगणकर व्यायाम शाळा यांच्या वतीने रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे येथे सकाळी आठ ते पाच या वेळेत पुरुष व महिला भव्य पावर लिफ्टिंग स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सदरच्या स्पर्धेमध्ये २०० ते २५० स्पर्धक भाग घेणार आहेत. सदर स्पर्धत नॅशनल स्तरावर प्राविण्य मिळवलेले स्पर्धक सहभागी झाल्यामुळे ही स्पर्धा आणखीनच रंगतदार होणार आहे.
सदरची स्पर्धा सब ज्युनिअर, सीनियर, मास्टर्स ५३/५९/६३/७४/८३/८३ प्लस महिला व पुरुष गटात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक गटनिहाय पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. तसेच सिंधुदुर्ग स्ट्रॉंग मॅन, वुमन यांना मानाचा पट्टा /चषक /प्रोटीन पॅक दिले जाणार आहे.
तरी स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गणेश वायंगणकर जामसंडे यांच्याशी संपर्क साधावा. व जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत उपस्थित राहुन स्पर्धेचा आनंद घ्यावा. असे आवाहन वायंगणकर्स व्यायामशाळेचे गणेश वायंगणकर यांनी केले आहे.





