जि.प.शाळा विलवडे नं. २ चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात…!

बांदा : शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शाळेची समस्या असतील तीच्या खर्चाचा तपशील द्या ती सोडविण्यात कटिबंध आहे, अशी ग्वाही माजी उपसभापती विनायक दळवी यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा विलवडे नं.२ प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थीतीत मोठ्या उत्साहात संपन्र झाला. यावेळी दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळा प्रवेशद्वाराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दळवी बोलत होते. टेंबवाडी व  मळावाडीतील सर्व ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पालक यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी केला.

प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश काळे व उपशिक्षक सचिन शेळके यांचे सुयोग्य व्यवस्थापन करत सर्व ग्रामस्थ व पालक यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे.

मुलाचे कार्यक्रम खुपच छान असल्याने गावातील प्रेक्षक वर्गातून सर्वच मुलांनी वाहवा मिळविली. स्वागत पद्य,संस्कार गीत व इतर गितांनी सर्व मान्यवरांनी १७ ही मुलांचे काैतुक केले. कोरीयोग्राफर कु. शारदा गंगाराम मेस्त्री, संगित साद देणारे आबा परब, भिकाजी (बाबू) दळवी यांनी गेले महिनाभर परिश्रम घेतल्याने मुलांच्या कार्यक्रमास रंगत आणली.

१७ लहान  मुलांचे कार्यक्रम करणे हे  सोपे नाही.ते पण रात्री ८ ते १२.३० वाजेपर्यंत. खरं म्हणजे  सर्व पालकांनी हिरिरीने भाग घेतला. महिन्याभर पालकांची धावफळ पहायला मिळाली. आपल्या पाल्यासाठी कपडे इतर साहित्य समवाजमव करणे हे पणं तेवढे सोपे नाही. मान्यवरांनी पालकांचै काैतुक कले.

यावेळी सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी, केंद्रप्रमुख संदीप गवस, माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे, अपर्णा दळवी, नारायण दळवी, अध्यक्षा रश्मी सावंत, माजी सरपंच साक्षी दळवी, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा नं. १ मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, हायस्कूल मुख्याध्यापक बुध्दभुषण हेवाळकर, माजी शिक्षक मालू लांबर, महेंद्र सावंत, जितेंद्र दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी, रमण सावंत, लक्ष्मण सावंत, समीर सावंत, संजय सावंत, सोनू दळवी, सुरेश सावंत, आशिका सावंत, विलास गावडे, सायली दळवी, मनाली दळवी, विश्वनाथ सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेश काळे, आभार सुरेश सावंत यांनी मानले.