सावंतवाडी : रविवारी रात्री सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर सुप्रसिद्ध गायक संगीतकार जुबीन नौटियाल यांचा लाईव्ह कन्सर्ट कार्यक्रम मोठ्या दिमाखदारपणे आयोजित करण्यात आला होता.

तब्बल अडीच तास उपस्थित तरुणाईला वेड लावणाऱ्या जुबीन नौटियाल यांनी आपल्या गायनाने आणि वाद्यवृंदाने आपल्या अप्रतिम स्वर तालवर येथील तरुणाईला थीरकायला भाग पाडले. जुबीनच्या प्रत्येक गाण्याच्या तालावर उपस्थित युवक – युवतींनी जोरदार प्रतिसाद देत कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी सावंतवाडी जिमखाना मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. विशेषता युवक आणि युवतींची संख्या यात लक्षणीय होती.
दरम्यान सुंदर आयोजन आणि नियोजनाबद्दल उपस्थित हजारो तरुणाईने विशाल परब आणि त्यांच्या आयोजन समितीला लाखो धन्यवाद देत विशाल परब यांना दरवर्षी वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम आयोजित करावेत, अशी विनंतीही केली.
दरम्यान विशाल परब यांनी देखील तरुणाईला पुढील वर्षी यापेक्षा अधिक दर्जेदार कार्यक्रम करण्याचा मानस असल्याचे सांगत आपण युवकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीला पोषक अशा कार्यक्रमांचे आयोजनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.





