दिग्गजांच्या उपस्थितीत विशाल परब यांचा वाढदिवस दिमाखात साजरा.! ;  अनेकांनी विशाल परब यांच्यावर शुभेच्छांचा केला वर्षाव.!

84

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस रविवारी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आयोजित जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह कन्सर्ट कार्यक्रमादरम्यान साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री भागवत कराड, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे आमदार चंद्रकांत शेटये, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल परब यांचे पिताश्री प्रभाकर परब, सुविद्य पत्नी सौ. वेदिका परब व परब कुटुंबिय, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तसेच भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी जिल्ह्यातील असंख्य नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत व हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी विशाल परब हे नाव आता दिल्लीत गाजू देत, अशा शुभेच्छा देत विशाल परब यांच्या विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले.