सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेमध्ये डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. डॉ.कलाम यांच्याविषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या दिवशी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त प्रशालेमध्ये वाचन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






