भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बालकांचाही समावेश! ; तब्बल २३ जण जखमी.

195

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताचे सत्र सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २३ जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान बालकांचा देखील समावेश आहे.

सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. सध्या घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.

ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात मृतांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून हे प्रवासी पुन्हा नाशिककडे परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत सुरू केली. जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिस आधिक तपास करत आहेत.