राडेबाज संस्कृतीला वेळीच आवर घाला अन्यथा सेनास्टाईलने प्रत्युत्तर देऊ.! : युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.

99

देवगड : देवगड शहरातील रुग्णालयात समर्थकांची राडेबाज संस्कृती सर्वांना दिसल्याचे ताजे उदाहरण असतानाच मिलिंद माने व नगरसेविका सौ प्रणाली माने या मुजोर राणे समर्थकांनी एका अल्पवयीन कॉलेज युवकाला बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सुसंस्कृत देवगडला अशोभनीय असून अशाप्रकारे राडेबाज संस्कृतीची सुरुवात करणाऱ्या मुजोर राणे समर्थकांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा अन्यथा युवासेना गप्प बसणार नाही.असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे. एका अल्पवयीन कॉलेज युवकावर मारहाण केल्याच्या घटनेचा युवासेनेने तीव्र शब्दात निषेध करत देवगड पोलीस स्टेशनला भेट देऊन याबाबत योग्य ती कारवाई करावी व मिलिंद माने यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी, वस्तू व मोबाईल जप्त करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे. याबाबत गुन्हा दाखल होऊन देखील ही माहिती पोलिसांनी पत्रकारांपासून का लपवली असा सवाल देखील युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विचारला आहे.


शांतताप्राय असलेले देवगड शहरात राणे समर्थकांची रडबाज संस्कृती सुरू झाली असून एका राणे समर्थक मुजोर कार्यकर्त्यांने एका अल्पवयीन कॉलेज युवकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या युवासेना निषेध करत आहे असे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, नगरसेवक संतोष तारी, निवृत्ती तारी,संतोष दळवी, प्रफुल कणेरकर आदी उपस्थित होते.
देवगड शहरात एका अल्पवयीन कॉलेज राणे समर्थक मिलिंद माने यांनी बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांची पत्नी नगरसेविका सौ प्रणाली माने या देखील उपस्थित होत्या. पती पत्नीने मारहाण करून त्यांचा व्हिडिओही केला ही घटन सुसंस्कृत देवगड शहराला अशोभनीय आहे. अल्पवयीन मुलाला मारहाणीच्या घटनेचा युवासेना निषेध करीत आहे. माजी आमदार आप्पासाहेब गोगटेंची संस्कृती देवगडमध्ये आहे. मात्र भाजपमध्ये राणे परिवार दाखल झाल्याने भाजपची सुसंस्कृत संस्कृती बाजूला पडली असून राडेबाज संस्कृती आली आहे. देवगडमध्ये राडा संस्कृती कोणी आणली हे सर्वांनाच माहिती आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयातील प्रकार याच राडा संस्कृतीमुळे झाला होता या घटनेनंतर काही दिवसातच राडासंस्कृती करणाऱ्या राणे यांच्या एका कार्यकर्त्यांने एका अल्पवयीन कॉलेज युवकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार निषेधार्थ आहे. राणे समर्थकाकडून आता दादागिरीची भाषा सुरू झाली असून हम करेतो कायदा अशा अविर्भावात राणे समर्थक वावरत आहेत. देवगडच्या चांगल्या संस्कृतीची नाच्चकी करणारी ही राडा संस्कृती आहे अशा संस्कृतीला पोलिसांनी आळा घालावा. त्या अल्पवयीन मुलाचे वडील कायदेतज्ञ असल्याने गुन्हा दाखल झाला. मात्र सर्वसामान्य व्यक्ती असती तर मारहाण करणाऱ्या मुजोर समर्थकांवर गुन्हा दाखल झाला असता का ? असा सवाल देखील नाईक यांनी यावेळी उपस्थित केला.
आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते मुजोर झाले आहेत अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करून देवगड होते तसे शांत करा अशी मागणी नाईक यांनी केली. या आधी सुद्धा स्थानिक नगरसेविका सौ प्रणाली माने यांनी आनंदवाडी येथील एका धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली होती. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. रुग्णालयात झालेल्या घटनेनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली मात्र त्याबाबत पोलिसांवर दबाव आहे.शिवसेनेने पोलिसांना आलेल्या अर्जावर कारवाई केली नाही तर पुन्हा पोलीस अधीक्षकांकडे जाणार असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे.