भर वस्तीत बिबट्याचा वावर…!

सावंतवाडी : तळवणे रवळनाथवाडी, माऊली टेंब वाडी, भाटलेवाडी येथे भर वस्तीत दिवस रात्रीच्यावेळी बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे रहीवाशांना बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. बिबट्या आपली भुक भागवण्यासाठी पाळीव कुत्र्यांना आपले लक्ष करत आहे. त्यामुळे बिबट्याचा वनखात्याने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने तळवणेचे सरपंच गोवींद (समीर) केरकर व उपसरपंच रामचंद्र गावडे व पंचसदस्य सिद्धेश कांबळी व सावळाराम घाटये, रेश्मा टाककर यांनी केली आहे.