बेपत्ता खलाशाच्या मृतदेह पडवणे समुद्रकिनारी…!

देवगड : देवगड बंदरातील तुकाराम प्रभाकर बांदकर यांच्या मालकीच्या चांदणी नौकेवरून वेफत झालेली खलाशी गुजाप्पा रामप्पा पूजार ( 32 रा. यलगुर्ला कर्नाटक) यांचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पडवणे समुद्रकिनारी आढळला.
गुजाप्पा पुजार देवगड बंदरातील चांदणी नौकेवर तांडेल म्हणून गतवर्षीपासून कार्यरत होते.

बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ते नौकेवर होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 6 वाजता नौकेवर इतर कर्मचाऱ्यांना ते दिसले नाहीत. त्यांनी याबाबत नौका मालकांना कळविल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र शोध न लागल्यामुळे नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात दिली. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पडवणे समुद्रकिनारी त्यांच्या मृतदेह आढळला .देवगड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवगड येथे आणण्यात आला होता. याबाबत अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.