देवगड – निपाणी मार्गावर अवजड मल्टीएक्सेल वाहतुकीवर बंदी आणावी.! ; देवगड मनसेची मागणी.

36

देवगड : अवजड मल्टीएक्सेल वाहतुकीवर बंदी आणावी. या वाहनांमुळे देवगड – निपाणी मार्गावर वाढलेले अपघात या विषयाला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने चर्चा करण्याकरीता पोलिसांनी वेळ दिल्याने दि.१०/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी पोलिसांमार्फत या वाहनांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, आमच्या अधिकार क्षेत्रात बंदी करणे बसणार नाही. अशा प्रकारची माहिती देण्यात आली. शिरगांव चेकपोस्ट हे फक्त अंमली पदार्थ व अतिरेकी गतिविधिंवर लक्ष ठेवण्यासाठीच असून इतर कोणत्याही वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही, अशी माहिती दिली. पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या उदासीनतेवर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आश्चर्य वजा खेद व्यक्त केला असून या वाहनांवर बंदी आणावी, अशी जनतेतून आग्रही मागणी केली जात असल्यामुळे या नंतर लवकरच जिल्हा कलेक्टर आणि सिंधुदुर्ग परीवहन विभाग यांची भेट घेऊन हा आमचा लढा असाच चालू ठेवणार आहोत, अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली. या प्रसंगी संतोष मयेकर, राकेश मिराशी (म.न.वि.से तालुका अध्यक्ष), पुरूषोत्तम जाधव (म.न.वि.से शहर अध्यक्ष), राजा मोंडकर,बबलू परब, राजन पवार, अभिजीत तेली, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.