कणकवली : देशात सर्वत्र परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम. नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये भेटी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विद्यार्थांना मार्गदर्शन आणी मुलांचे प्रश्न समजून घेणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. दरम्यान लाईव्ह च्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रम आयोजित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

आम. नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील शाळांना भेट देत कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबतीत असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान कणकवली कॉलेज कणकवलीच्या एच. पी. सी. एल हॉलमध्ये लाईव्ह स्क्रिन च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुलांचे प्रश्न देखील परीक्षा पे चर्चा २०२३ च्या माध्यमातून जाणून घेतले.
यावेळी आम. नितेश राणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, डॉ. राजश्री साळुंखे तसेच कणकवली कॉलेज कणकवलीचे सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच इतर शाळांतील विद्यार्थी या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाला उपस्थित होते.





