कणकवली : तालुक्यातील असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव निमित्त श्री सत्यनारायणाची महापुजा व आयोजित केलेले कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कै. सुमती विश्राम लोके यांच्या स्मरणार्थ सोसायटी चेअरमन भगवान लोके पुरस्कृत होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत प्रिया प्रेमानंद शेटये (कसई दोडामार्ग) या पैठणीच्या प्रथम मानकरी ठरल्या तर उपविजेत्या स्वरा सिताराम डगरे आणि तृतीय विजेत्या मानसी मिलिंद डगरे (मधलीवाडी ) या तिघांनाही पैठणी देत आ. नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धा २०२३ मध्ये तब्बल ३० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे निवेदन पत्रकार उमेश परब यांनी केले व वेगवेगळ्या ५ फेऱ्यांमध्ये स्पर्धा घेतली. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना भेटवस्तू देत सन्मानित देखील करण्यात आल.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.





