सिंधुदूर्ग : मालवणचे सुपुत्र आणि पोलिस पदकाचे मानकरी सादिकखान मुजावर यांना अंधेरी (पश्चिम) मुंबई, डी. एन नगर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे. ३२ वर्ष प्रमाणिक पणे केलेल्या कामामुळे सादिकखान मुजावर यांची पदोन्नति देण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनदंन होत आहे.
सिंधुदूर्ग मधील बऱ्याच पोलिस स्थानकात सादीकखान मुजावर यांनी पोलिस हवालदार म्हणून काम केले आहे. मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून त्यानी काम पाहिले आहे.





