नवी दिल्ली : तिबेटचे अध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा हे एम्समध्ये उपचार घेत असल्याच्या वार्ता केल्या जात होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केला जात होती. मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) हे वृत्त फेटाळून लावलं आहे. असे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे रुग्णालयाने म्हटलय.
दलाई लामांबद्दल अशी माहिती प्रसारित केली जात होती की,” त्यांना रविवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलय त्यांना ‘कार्डिओ-न्यूरो सेंटर’च्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ते कार्डिओलॉजीचे प्राध्यापक डॉ.राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली आहेत.” मात्र, एम्सने या अफवाचं खंडन केलं आणि स्पष्ट केलं की दलाई लामा शनिवारी किंवा रविवारी एम्समध्ये आले नाहीत. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलेले नाही. यापूर्वी, सूत्रांच्या हवाल्याने दलाई लामा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त आले होते.





