सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारींचे ‘टीम महाराष्ट्र माझा’कडून वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन.!

36

सावंतवाडी :  सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. ऋषिकेश अधिकारी यांचे आज वाढदिवसानिमित्त ‘टीम महाराष्ट्र माझा’च्या वतीने शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ्या देण्यात आल्या. यावेळी ‘महाराष्ट्र माझा’चे ब्यूरो चीफ प्रा. रुपेश पाटील तसेच व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परब, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस बांधव उपस्थित होते.

दरम्यान सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थाची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. ऋषिकेश अधिकारी यांचे व समस्त पोलीस प्रशासनाचे अभिनंदनही महाराष्ट्र माझाच्या टीमच्या वतीने यावेळी करण्यात आले.