टीम इंडियाला आर्चरीमध्ये ज्योतीने मिळवून दिलं गोल्ड! ; तर अदितीने जिंकल ब्रॉन्झ.

39

हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. आज शनिवारी देखील भारताने भारताची सुरुवात चांगली झाली. तिरंदाजीत कांस्यपदकानंतर भारताने सुवर्णपदक देखील मिळवले आहे.. भारताच्या ज्योती वेन्ननने चमकदार कामगिरी करत तिरंदाजीची अंतिम फेरी जिंकली. दक्षिण कोरियाच्या खेळाडूला हरवून ज्योतीने सुवर्णपदक जिंकले. याआधी अदितीने तिरंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने टीम इंडियासाठी कांस्यपदक जिंकले होते.

ज्योतीने कंपाऊंड इंडिविजुअल फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा149-145 असा पराभव केला. या विजयासह तिने सुवर्णपदक पटकावले. ज्योतीने याआधीही चमकदार कामगिरी केली आहे. तिने कंपाऊंड विमेंन्स टीम इव्हेंटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि भारतासाठी सुवर्ण जिंकले. ज्योतीने मिक्स्ड टीम इव्हेंट जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा प्रकारे ती तीन सुवर्णपदकांची वाटेकरी ठरली आहे. ज्योतीच्या विजयासह भारताने 97 पदके जिंकली आहेत. तर टीम इंडियाची 100 हून अधिक पदके निश्चित झाली आहेत.

भारताच्या शनिवारची सुरुवात कांस्यपदकाने झाली. अदिती स्वामीने कंपाऊंड इंडिविजुअल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अदितीने इंडोनेशियन खेळाडूचा पराभव केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदिती अवघ्या 17 वर्षांची आहे आणि तिने अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील टीम इव्हेंटमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.