सावंतवाडी : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. यात
१७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये – १) कु . आलिया दर्गावाले – प्रथम क्रमांक, २) कु . प्रिया राणे – द्वितीय क्रमांक, ३) कु . कृतिका परब – तृतीय क्रमांक. तर
१४ वर्षांखालील मुलगे गटामध्ये – कु. सुशोभन सावंत – प्रथम क्रमांक,
१७ वर्षांखालील मुलगे गटामध्ये – कु. सर्वेश सावंत – तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
वरील सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





