विलवडे – वाफोली रस्त्याची झाली दुर्दशा.! ; अपघात झाल्यास जबाबदार कोण.?, ग्रामस्थांचा सवाल.

36

बांदा : बांदा – दाणोली मार्गावर विलवडे – वाफोली रस्त्याची अति पाऊसामुळे रस्ता पूर्णत:  खड्डेमय बनला आहे. गणपतीपूर्वी सदर रस्त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याची तात्पुरती डागडूजी करण्यात आली. त्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासासंबधित कोणतीही हालचाल दिसून आली नाही. उलट रस्‍त्याची समस्या खूपच बिकट बनली आहे. टेंबवाडी – सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे, काही महिन्यापूर्वी धरनानजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलेमोठे खड्डे, तर वाफोलीनजीक रस्त्याची चाळण झाली आहे. डोंगरीकर हाँटेल समोर जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. वाहनचालकांसह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.या खड्ड्यांमुळे हा वाहनांचा मार्ग आहे की नाही हेच कळत नाही आहे. या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.या मार्गावरून वाहने चालवणे तारेवरची कसरत आहे. खड्डे बुजविण्यासाठी संबधीत विभागाला बळी गेल्यावर जाग येणार का? यापुढे या मार्गावर खड्ड्यामुळे अपघातात दुर्घटना घडल्यास सबधित जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक बनले आहे.शाळेतील विद्यार्थाना प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.या सबधित् विभागाकडून गणपती पूर्वी तातपुरती मलम्पट्टि केली.परतु मुसळधार पावसाने मार्गावरील खड्ड्यांचा आकार मोठा झाला. विलवडे व वाफोली पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून ठिकठिकाणी महाकाय खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. सद्य:स्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबधित विभागाने तातडीने योग्य ते पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.