नगरसेवक रोहन खेडेकर अपात्रचं.! ; आयुक्तांनी फेटाळला अपील.

103

देवगड : देवगड – जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना नगरसेवक असताना नियमबाह्य केलेल्या बांधकाम प्रकरणी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवले होते. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केला होते. हा अपील अमान्य होऊन नगरसेवक रोहन खेडेकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ही तक्रार मान्य करून खेडेकर यांना नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. याबाबत खेडेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केला होता,  मात्र हा अपील फेटाळला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला आहे.