९ ऑक्टोबरला कुडाळ येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन.! ; निमित्त विशाल परबांच्या वाढदिवसाचे.

41

कुडाळ : भाजपाचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ऑक्टोबरला कुडाळ येथे ह. भ. प. इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे व भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा साईल व संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.