बेकायदा चोरटी वाळूची वाहतूक, तिघांवर गुन्हा दाखल.! ; बांदा पोलिसांची कारवाई.

504

बांदा : बेकायदा बिगर परवाना रॉयल्टी परवाना न घेता चोरटी वाळू भरून वाहतूक करीत असताना मिळून आले म्हणून बांदा पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण सुभाष कांबळी यांच्या फिर्यादीनुसार आरोपी देवेंद्र महादेव नेवगी, वय – 31 वर्ष, रा. घावनळे, भामनादेवीवाडी ता.कुडाळ, राजेश पांडुरंग शिरोडकर, वय- 40 वर्ष, रा. पेंडूर सातवायगनीवाडी, ता. वेंगुर्ला व वीरेंद्र दत्ताराम सावंत, वय- 26 वर्ष, रा. वर्दे मांजरवाडी, ता.कुडाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 03/10/2023 रोजी 19.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली आहे. इन्सूली चेकपोस्ट ता. सावंतवाडी येथे 03/10/2023 रोजी 21.27 वा. पोहवा देसाई,बांदा पोलीस ठाणे यांनी हा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासीक अधिकारी म्हणून पो.उ.नि. समीर भोसले, बांदा पोलीस ठाणे काम पाहत आहेत.