मिलाग्रीस प्रशालेचे अभिनव स्वच्छता अभियान..!

35

सावंतवाडी : दिनांक १ अॉक्टोबर २०२३ रोजी ‘एक तारीख एक तास श्रमदान’ उपक्रम अंतर्गत स्वच्छता मोहीम सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूल या प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी राबवली. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शालेय परिसर स्वच्छ केला. तर इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार कार्यालय आवार,  जगन्नाथराव भोसले उद्यान तसेच शाळेबाहेरील सर्व परिसर स्वच्छ केला.
या श्रमदान मोहिमेचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी तसेच पालक वर्ग, शहरातील नागरिकांनी केले.