वनसंरक्षकच बनलेत वनभक्षक.!, रेड्डी यांचं ॲफिडेव्हीट खोटं.! ; मायनिंग सम्राट, भ्रष्ट सरकारच्या दबावाखाली दिलं प्रतिज्ञापत्र.! – डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा घणाघात.

89

सावंतवाडी : सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सावंतवाडी, दोडामार्गमधील वाईल्ड लाईफ कॉरिडोर संदर्भात उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केलं असून आपण त्या विरोधात आव्हान देणारी याचिका दाखल करणार आहोत. रेड्डी यांनी फक्त मायनिंग प्रकल्प वाचवण्यासाठी कुणाच्यातरी दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, पण त्यांचा हा निर्णय हाणून पाडू, वनसंरक्षक हेच आता वनभक्षक बनले आहेत, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे केला.

दरम्यान सावंतवाडी व दोडामार्गमधील प्रस्तावित 49 मायनिंग प्रकल्प सुरू व्हावेत. यासाठी दबावापोटी उपवनसंरक्षकांनी हे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. ते आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत उपस्थित होते.