मिलाग्रीस प्रशालेत म. गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.!

33

सावंतवाडी : दिनांक २ अॉक्टोबर २०२३ रोजी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री  यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी प्रशालेची विद्यार्थिनी कु. श्रावणी आरोंदेकर हिने महात्मा गांधी यांच्याविषयी सुंदर विचार आपल्या मनोगतातून मांडले. यावेळी उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.