जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव कणकवलीच्या विद्यामंदिर प्रशालेत संपन्न.!

143

कणकवली : प्रादेशिक विज्ञान संस्था नागपूर, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सव कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मंगळवारी साजरा झाला. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी विज्ञान आणि मानवी जीवन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून नाट्य कलाकाराना शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी  किशोर गवस, उपशिक्षणाधिकारी श्रीमती आवटी मॅडम यांनीही नाट्य महोत्साला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी केले.

विज्ञान नाटक आणि बालरंगभूमी याविषयी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी मार्गदर्शन केले आणि विज्ञान नाट्यातून समाज प्रबोधनाची चळवळ कशी निर्माण होते, याविषयी मत प्रदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या नाट्य स्पर्धेसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठ तालुक्यातून आठ संघ उपस्थित होते. उत्कृष्ट नाटय सादरीकरण करून प्रत्येक संघाने आपला प्रभावी ठसा उमटविला . या नाट्य महोत्सवाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका सौ. केळुसकर मॅडम आणि जे. जे. शेळके यांनी केले. या नाट्य महोत्सवाचे परीक्षण निलेश पवार, चव्हाण सर यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभाला प्राथमिक व योजना शिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर उपस्थित होते. आपल्या अमोघ वक्तृत्वाने सर्व स्पर्धक आणि शिक्षकांना त्यांनी प्रोत्साहित केले. तसेच विजेत्या संघाचे कौतुक केले. यावेळी आवटी मॅडम, श्री. मेंगाने साहेब उपस्थित होते.

या दिवसभराच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नेटके नियोजन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे, विज्ञान विभागातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. आभार श्री. वणवे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .