भिवंडीत दुमजली इमारत कोसळली | एकाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंड इथं पहाटेच्या सुमारास एक जुनी दुमजली असलेली इमारत कोसळली. या दुर्घटनेत माजिद अन्सारी वय 25 वर्षं या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एका इसमाला सुरक्षीत बाहेर काडण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.