युवा प्रतिष्ठान, पिंगुळी करंगुटकरवाडी आयोजित नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

कुडाळ : युवा प्रतिष्ठान, पिंगुळी करंगुटकरवाडी आयोजित आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भव्य मोफत कॉम्पुटरद्वारे नेत्र तपासणी शिबिर आणि अल्पदरात चश्मा वाटप करण्यात आले. हे शिबिर जिल्हा परिषद मराठी शाळा, गोंधयाळे, जफर जमादार, भूपकर यांच्या निवासस्थानी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. केळकर यांची मुख्य उपस्थिती होती.

यावेळी पिंगुळी येथील श्री गणेश मेडिकलमधून कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस शाम भगत यांनी रुग्णांना मोफत ‘आय ड्रॉपचे ‘ वाटप केले. तसेच मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी पार पडली. या शिबिराचा फायदा अनेक नागरिकांनी घेतला.

येत्या २० फेब्रुवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत, अशी माहिती युवा प्रतिष्ठान, पिंगुळी यांच्याकडून देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे केतन शिरोडकर, शंकर सातारडेकर, अनिकेत आंदुरलेकर, विशाल कुंभार तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. युवा प्रतिष्ठानतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.