सिंधुदुर्ग : कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक बसून रेल्वे गेटजवळ स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.
दरम्यान संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हैशींचे मृतदेह बाजूला केले.





