देवगड पोलीस ठाणे येथे उत्कृष्ट कार्य करणार्‍या पोलीस पाटील यांचा सन्मान..!

363

देवगड : देवगड पोलीस ठाणे येथे आज देवगड तालुक्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यात वाडा पोलीस पाटील महेंद्र शरदचंद्र मांजरेकर, बापर्डे पोलीस पाटील नितीन घनःश्याम नाईकधुरे, जामससंडे पोलीस पाटील नेहा नितीन देशपांडे, दाभोळे पोलीस पाटील सानिका प्रदीप कदम, मुणगे पोलीस पाटील साक्षी गोविंद सावंत यांचा प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हजर होते.