‘महाराष्ट्र माझा’चे स्वप्निल लोके यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर.!

266

देवगड : तालुक्यातील मिठबाव येथील रहिवासी तसेच महाराष्ट्र माझा न्युज चॅनेलचे जिल्हा प्रतिनिधी स्वप्निल लोके यांना हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी – कराड या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
सहाव्या राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार २०२३ साठी स्वप्निल लोके यांची ‘आदर्श पत्रकार’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष यांनी दिली आहे. स्वप्निल लोके यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत असून ‘टीम महाराष्ट्र माझा’कडून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.