दळवी फाऊंडेशनच्या उद्याच्या स्वच्छता मोहिमेस अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे तात्पुरती स्थगिती. ! ; लवकरच नवीन तारीख कळविणार.

83

सावंतवाडी : एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन आयोजित वायंगणी समुद्र वेंगुर्ले तालुक्यातील किनारा स्वच्छता मोहिम सिंधुदुर्ग जिल्हयात अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसेच पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे फाऊंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग जिल्हयात हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्टयामुळे 48 तासात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन मार्फत नियोजित उद्या  दि. 2 ऑक्टोबरचा रोजी वायंगणी समुद्र किनारा तालुका वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे करण्यात येणारी स्वच्छता मोहिम तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग व मुंबई कोअर कमिटीने घेतला असून सदर मोहिमेची नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन मदने, उपाध्यक्ष चेतन बोडेकर,  जिल्हा सरचिटणीस विजय गावडे, व एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन सिंधुदुर्ग टीमच्या वतीने करण्यात आले आहे.