प्रजासत्ताक दिनानिमित्त कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर परेड…!

कुडाळ : प्रजासत्ताक दिनानिमित्त कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर परेड तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखात पार पडले. या निमित्त संत राऊळ महाराज, महाविद्यालय कुडाळ NCC विभागाच्या वतीने DEMO चे नियोजन करण्यात आले होते. यात “नारी शक्ति जिंदाबाद” च्या घोषणा देत NCC च्या senior wings girls Cadets नि “नऊ वारी ” साडी नेसून एका गाडीवर 5 मुलींचा धोकादायक पण आत्मविश्वासाने पराक्रम केला. सर्व मुलींचा आत्मविश्वास वाढवायचं होता आणि त्याच एका भावनेने आम्ही हा पराक्रम केला. असे कॅडेट म्हणाल्या. NCC विभागप्रमुख कॅप्टन. डॉ. एस. टी. आवटे यांनी तसेच माजी आणि आजी कॅडेटनि खूप सहकार्य केले.