सावंतवाडी : प्रत्येक उगवणाऱ्या सूर्योदया बरोबर सूर्याची दिशा बदलणे हे मानवाच्या हातात नसते, पण सूर्योदयाच्या साक्षीने रोज हळूहळू स्वतःची दिशा बदलणे स्वतःच्या हातात असते.असेच एक अविस्मरणीय कार्य आमच्या कावलेवाडी संघाने करण्याचे ठरविले आणि ते सत्यातही उतरविले.कालच ग्रामपंचायत क्रिकेट चषक 2023 स्पर्धे दरम्यान कावलेवाडी संघाने फायनल मध्ये प्रवेश केला तेव्हाच निच्छित झाले की पहिला किंवा दुसरा क्रमांक आम्ही पटकाविणार.
आणि त्यावेळीच आमचे कावलेवाडी संघाचे मालक आणि सच्चे क्रिकेटप्रेमी परेश बावकर याने आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन एक निर्णय घेण्याचे आवाहन केले की याच चाव्हाटा मैदानावर मागील स्पर्धे दरम्यान खेळताना एक खेळाडू गोटया नाईक यांचा पायाला अपघात झाला आणि त्याला हॉस्पिटल मध्ये भरपूर खर्चाला सामोरे जावे लागले. त्याचे कुटुंब त्याच्या हातावर अवलंबून आहे. त्याचे एक पेंटिंग गॅरेज आहे. आज ते बंद परिस्थितीत ठेवावे लागले.
कावलेवाडी संघाने माणुसकी म्हणून संघाला मिळालेले बक्षीस त्याला हॉस्पिटल खर्चासाठी मदत म्हणून द्यावे असे ठरविले.
त्याच प्रमाणे आम्हाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आणि लगेच ठरविल्या प्रमाणे आम्ही मंडळाला सांगून ती रक्कम श्री.गोटया नाईक यांच्या छोट्या मुलग्या जवळ आयोजक आणि कोलगाव सरपंच श्री. संतोष राऊळ यांच्या समक्ष सुपूर्त करण्यात आली. याच माणुसकीचे साक्ष म्हणून सर्व जमलेल्या क्रिकेटप्रेमींनी जोरात टाळ्या वाजऊन कावलेवाडी संघाचे कौतुक केले.या माणुसकीचे कावलेवाडी संघाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.





