10 वीत प्रथम आलेल्या आस्था नाईकधुरे हिने केले ध्वजारोहण…

देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत बापर्डे येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत बापर्डेमध्ये यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डेमधील इयता 10 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु.आस्था संदिप नाईकधुरे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सदर कार्यक्रमास बापर्डे गावचे सरपंच संजय हनुमंत लाड,ग्रा.प.सदस्य संतोष नाईकधुरे, गुणवंत राणे,रुपेश मोंडकर,सौ.स्वाती नाईकधुरे,सौ.दिशा वासगे,सौ.सुविधा पुजारे,तलाठी ए.एम.सावंत,कृषीसेवक ए.बी.सदावर्ते,बापर्डे आरोग्य उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी,डॉ.श्रीम.चित्रा पाटील,सिंधुदुर्ग बँक बापर्डेचे व्यवस्थापक स्वप्नेश कदम ,तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे,मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका, आशासेविका,ग्रामपंचायत कर्मचारीवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.