कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड जवळ टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. सदर अपघातात एक जण ठार झाला असल्याची माहिती समोर मिळाली आहे. हा अपघात आज पहाटे ५ ते ६ वाजताच्या सुमारास झाला असल्याचा अंदाज आहे.
सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. अपघात नेमका कसा झाला? हे मात्र समजू शकले नसले तरी टेम्पो पलटी होऊन दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघातात एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत असल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.








