सावंतवाडी : काल सायंकाळी सावंतवाडी शहरातील मोती तलावात एकाने उडी घेतली होती. सदर व्यक्तीचे संपूर्ण नाव मधुकर विठ्ठल गावडे असे असून अंदाजे वय 58 इतके आहे. त्यांचे मुळ गाव चौकुळ – मराठेवाडी आहे. त्यांच्या पश्चात वृद्धा आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे. त्यांचे लहान भाऊ मुंबई येथे नोकरीस आहेत. त्यांचे वडील साधारण 22 वर्षांपूर्वी वारले आहेत. मयत गावडे यांनी साधारण
30 वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. अशी माहिती मिळाली आहे.





