मिलाग्रीस हायस्कूलच्या संगीत मंचाची गणेश वंदना.! ; गणेशोत्सवात शाळेचा अभिनव उपक्रम.!

35

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून मिलाग्रीस हायस्कूलच्या संगीत मंचाने सावंतवाडी सालईवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळांने प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीसमोर गणेश वंदना सादर केली. या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, संगीत शिक्षक अमोल राऊळ, स्वप्नील गोरे व शिक्षक दत्ताराम नाईक यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.