- देवगड : क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जांभ्या दगडाचे चिरे वाहतुक करणा-या पाच ट्रकगाडयांवरती कारवाई करुन 1 लाख 47 हजार 775 रुपयांचा दंड तहसिलदार देवगड यांनी ट्रकमालकांवरती ठोठावला आहे. सदरची कारवाई ही बुधवारी करण्यात आली.
गणेश चतुर्थी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपली वाहने घेऊन कोकणात येत असल्यामुळे अवजड वाहनांमधून चेहरे वाहतूक गणेश चतुर्थी कालावधीमध्ये बंद ठेवावी अशी मागणी राजकीय पक्षांसह नागरिकांमधून करण्यात आली होती परंतु त्या घटनेला चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांनी तिलांजली देत अवजड वाहनातून चिरे वाहतूक सुरूच ठेवली या मुजोर वाहन चालकांना अखेर तहसीलदार रमेश पवार यांनी चांगलाच दणका देत सुमारे पाच अवजड वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गौरी गणपती सणाला देवगड निपाणी महामार्गावरून नांदगाव ते देवगड या मार्गाने भरधाव येणारी चिरे वाहतूक करणारी वाहने ची वाहतूक बंद ठेवण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती व तशा स्वरूपाच्या सूचना संबंधित व्यावसायिकांना देऊनही चिरे वाहतूक करणारी १४ ते १६ चाकी वाहने मोठ्या प्रमाणात नांदगाव ते देवगड मार्गावर येत असल्याचे निदर्शनास येतात व या चिरे वाहतुकी मधून क्षमतेपेक्षा अधिक ओव्हर लोड चिरे वाहतूक करण्यात येत आहे हे महसूल प्रशासनाच्या निदर्शनास येताच महसूल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन देवगड तालुक्यातील नांदगाव देवगड मार्गावरील तोरसोळे फाटा येथे ५ ट्रक मोठी वाहने चिरे वाहतूक करीत असताना अडविली व ती ताब्यात घेतली आहेत. ही पाचही वाहने देवगड तालुक्यातून कोल्हापूर, कर्नाटकच्या दिशेने चिरे वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले असून या संदर्भात देवगडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी या वाहनांवर 1 लाख 47 हजार 775 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे चिरे वाहतूक करणारे ट्रक हे देवगड तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत.
या मोहिमेत देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी चव्हाण, मंडळ निरीक्षक पावस्कर, तलाठी बोडके , नाडे या पथकाने ही कार्यवाही केली आहे. या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगाने येतात अपघात दोन नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होत होता. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या वाहनांवर कारवाई केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून जिरेखाण वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.








