ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी उडवला धुव्वा.! ; भारताने मालिकेत घेतली विजयी आघाडी.

102

इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशा फरकाने विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय संघाने पाच गडी गमावून ३९९ धावा केल्या होत्या. मात्र, पावसाचा अडथळा आल्यामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३३ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २८.२ षटकांत २१७ धावांवर आटोपला.